STORYMIRROR

Daivashala Puri

Romance

3  

Daivashala Puri

Romance

!!गंध प्रीतीचा!!

!!गंध प्रीतीचा!!

1 min
491

गंध प्रितीचा घेऊन आली 

सोनरूपेरी शालू ल्याली प्रित आगळी...


सुगंधित हा गोड मारवा 

प्रितीचा बोचरा गारवा

दिप तारका पंक्तींच्या 

उधळीत आल्या सुगंधाच्या

गोड मिलनी सांध्य कलेच्या 

नाजूक साजूक सांज ल्याली 

गंध प्रितीचा घेऊन आली  

सोनरूपेरी शालू ल्याली प्रित आगळी...


वसुंधरेच्या अधरांवरती 

जणू सांध्य लाली रेंगाळती 

शुभ्र चांदणे प्रितीचे पडे  

थेंब टपोरे रेतीवरती  


सुंदर क्षण या प्रितीचे

सागरात या न्हावूनी जावे  

या प्रितीच्या वाटेवरती 

डोळे मिटूनी भान हरावे 

गंधाळलेले क्षण प्रितीचे 

वेचीत गेली प्रित आगळी 

गंध प्रीतीचा घेऊन आली  

सोनरूपेरी शालू ल्याली प्रित आगळी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance