STORYMIRROR

Daivashala Puri

Romance

4  

Daivashala Puri

Romance

प्रेमदूत

प्रेमदूत

1 min
304

शरदाचे हे शुभ्र चांदणे 

दुधात मिसळून अमृत झाले 

चंद्र आणिक तारे सगळे 

खेळाया मग नभी निघाले 


मंद मंद हा प्रकाश शीतल 

धुंद बोचरा झोंबे वारा 

प्राणप्रियेच्या काळजातला 

फुले हळूच मग मोर पिसारा 


सडा सिंपडीत नभोमंडली 

शुभ्र चांदण्या लखलखती 

नेसून मग चंदेरी शालू 

फिरती चंद्राच्या भोवती 


दुधाळल्या या प्रकाश धारा 

चांदण्यात ही रात्र बहरली 

शांत निवांत एकांत पाहूनी 

 जणू वसुंधरा मोहरली 


प्रणय बावऱ्या प्रियतमेला 

तुझीच उपमा देती सारे 

धुंद होऊनी दाही दिशा या 

साक्षीला मग असती तारे 


ढगा आडूनी लपूनी पाहतो 

प्रणय लीला तू युगुलांच्या 

चांदण्यातले गोड गुपीत तू 

मनातले जाणी त्यांच्या 


स्वप्न कुणाचे साकारलेले 

कुणाचा चंद्र असे अधुरा 

साक्ष तुझी रे युगायुगाची 

प्रेमदूत रे तूच खरा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance