STORYMIRROR

Daivashala Puri

Others

4  

Daivashala Puri

Others

गुलाब

गुलाब

1 min
318

गुलाबाचे गोड फुल 

आवडते सर्वांना 

विविध रंगात जणू 

गुंततात भावना  


सुंदर अन् डौलदार 

थाट असे आगळा 

अाबाल वृद्धांनाही पहा 

लागतो त्याचा लळा 


चाचा नेहरूंच्या असे 

कोटाची तो शान 

हृदयाशी राहण्याचा 

मिळे त्याला मान 


कधी सजे फुलदानी 

कधी विणतो हार 

प्रेयसीच्या हातातील

फुल कधी सुकुमार 


रक्षणाला असे जणू 

दाट काट्यांचा पहारा 

टोचणाऱ्या काट्यांशीही 

मैत्रीचा हा मंत्र न्यारा 


गुलाबाकडून शिकावी 

मैत्रीची ही परिभाषा 

निरागस मैत्रीत कशा 

फुलतात दाही दिशा 


मने जोडण्याची कला 

आहे त्याची आगळी 

त्याच्या सौंदर्यात असे 

नशाच ही वेगळी


साहित्याला गुण द्या
लॉग इन