निशाराणी
निशाराणी


आता हळूहळू ती होईल सांजवेळ
आकाशी तारकांचा रंगेल छान खेळ
थकून भागून घरी निघे दिनकर
भेटी तव सख्याच्या निशाराणी आतुर
सजून वाट पाहे निशा दिनकराची
मनात हुरहुर आतुरता भेटीची
पेटवून चांदण्याचे दिवे अंगणात
काहूर आठवांचे तेवणाऱ्या दिव्यात
मनी मिलनाचे घेऊन स्वप्न नयनी
गालात हसे गोड हळूच निशाराणी