STORYMIRROR

Rucha Rucha

Romance

4  

Rucha Rucha

Romance

सौंदर्य एक नक्षत्र

सौंदर्य एक नक्षत्र

1 min
533

नक्षत्राप्रमाणे रूप तुझं

डोळ्यात मी साठवलं

हेवा वाटावा तुझा

म्हणुनी तुला आठवलं।।


हरणाप्रमाणे बोलके डोळे

करती इशारे खट्याळ फार

रूप तुझे निरागस भोळे

पाहून चंद्राने पत्कारली हार।।


ते गुलाबासम ओठ

त्यास देठ हनुवटी

गालाच्या कमानीत जोड

 मानेला जुळू पाहती।।


केवड्याप्रमाणे तुझी कांती

आवाजात तुझ्या मेवा

तेवत राहूदे तो गोडवा

म्हणुनी तुझा मज हेवा।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance