STORYMIRROR

Dipali patil

Romance

4  

Dipali patil

Romance

भेट

भेट

1 min
268

भेट होती प्रथम

काय बोलावे सुचेना

घेतला पुढाकार मी

केली सुरूवात प्रश्नांना


क्वचितही भीती नाही

गेली जेव्हा सामोरा

जाहली सुरूवात चर्चेला

मधेच येई अंगावर शहारा


नजरेला भिडली नजर

अस वाटत त्याचक्षणी

झाली एकमेकांची

पसंती मनोमनी


मी दिसायला साधरण

तो दिसतो देखना

तरी त्याने कधी

केली नाही तुलना


जात होते दिवस

आठवणीत एकमेकांच्या

प्रेमात होते मी

जुळल्या तार मनाच्या


किती खास असतो

क्षण ज्यावेळी कुणी

व्यक्त करत प्रेम

मन मोकळे करूनी


चंदेरी होतो चेहरा

विचार प्रफुल्लित

सगळ वाटत छान

गातो मनोमनी प्रेमगीत



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance