STORYMIRROR

Dipali patil

Romance

4  

Dipali patil

Romance

बंध

बंध

1 min
265

मन वेडे हे गुंतले

मितवा तुझ्या प्रेमात

परिमळ बंध आपले

रंगले रंग जीवनात


तू माझा नी मी तुझी

जाहलो कधी कळेना

सांज गोड गुलाबी

ढळता ही ढळेना


सुखात झरा तू 

दुःखात सावली उन्हाची 

साथ लाभावी आजीवन

मनोकामना ही मनाची


हवा विश्वास नात्यात

निष्ठा नितांत नियतीत

सखा सोबती निरंतर

भुलावणारा अवचित


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance