STORYMIRROR

Dipali patil

Others

4  

Dipali patil

Others

संसार

संसार

1 min
235


कशासाठी पोटासाठी 

कष्ट करू जीवनात

मरमर जगतो हो

खडतर आयुष्यात


सुख दुःखे हाताळून

सोप्पे करू संकटाला 

अश्रू पुसून आपले

प्रेम देऊ समाजाला 


सुरवात कशीबशी

केली आम्ही संसाराला

उणे दुणे पाठी गेले

साथ ही साथीदाराला 


सखा हा मितवा माझा

सुखावतो हा मजला

पाठबळ एकमेकां

सारिपाठ हा सजला


ईश्वराचा आशीर्वाद

नियतीत साधेपणा

मेहनती मनगट

यश लाभेल जीवना


Rate this content
Log in