STORYMIRROR

Rucha Rucha

Romance

4  

Rucha Rucha

Romance

सखे तुझ्या आठवणी

सखे तुझ्या आठवणी

1 min
481

आहेत सखे तुझ्या आठवणी

जणू की मोरपिसाचा स्पर्श

क्षणिक येतात नि जातात

तरीही होतो मनास हर्ष


आहेत सखे तुझ्या आठवणी

जणू आपल्या प्रेमाचं गाव

रोमांचित सुखद क्षणांनी घेते

मन माझे गतकाळी धाव


आहेत सखे तुझ्या आठवणी

म्हणजे आपल्या प्रेमाची भाषा

भेटशील तू मला पुन्हा नव्याने

हीच उरली जगण्याची आशा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance