Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

UMA PATIL

Romance

4  

UMA PATIL

Romance

लग्न...

लग्न...

1 min
235


नयनांचे नयनांना इशारे कळले

तुझ्यावर माझे प्रेम असे गं जडले

बघितल्या तुझ्या वेगवेगळ्या अदा

मी झालो बघ तुझ्यावरच गं फिदा ||१||


तुला विचारण्याची होईना हिंमत

प्रेमाने केली माझी अशी गत

तू दिसल्यावर मी लटपट कापतो

माझ्या मनावर तुझे चित्र छापतो ||२||


प्राण कंठात साठवून विचारतो तुला,

" तू देशील का आजन्म साथ मला ? "

तुझ्या प्रेमात दिवस-रात्र झुरतो

तुझ्यासाठी रोज असा मरतो ||३||


आपण करू सुखाचा संसार

नेहमी असेल मी तुझा आधार

सोबतीने घालवशील का आयुष्य ?

बघशील का सुखाचं इंद्रधनुष्य ? ||४||


लेकरांना शिकवून खूप मोठं करू

मुलांच्या यशापुढे आनंदाने हरू

सखे, जाणूनी घे माझी विनंती

दे मला आता तू प्रेमाची स्वीकृती ||५||


मी तुझ्या प्रेमाला देते आहे होकार

आजन्म करते आहे तुझाच स्वीकार

आपल्या प्रेमाचा रंग आहे वेगळा

आनंदाने साजरा करू लग्नसोहळा ||६||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance