STORYMIRROR

Manisha Awekar

Romance

4  

Manisha Awekar

Romance

प्रेमाची जाण

प्रेमाची जाण

1 min
340

प्रेमाची अनुभूती

रोमरोमी बहरली

नजरेला नजर भिडताच

माझी नजर झुकली


त्याच्या डोळ्यांत तेव्हा

प्रेम भरलेले

जवळ येऊन त्याने

हात धरलेले


शब्दांवाचून आम्हांला

शब्दांपलीकडचे कळले

एकमेकांवरचे प्रेम

डोळ्यांतून पाझरले


हळूच त्याने माझे

गोड चुंबन घेतले

गाढ मिठीत त्याच्या

प्रेम मला उमगले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance