क्रमांक ३९ विषय रंग
क्रमांक ३९ विषय रंग
1 min
141
रंगुनिया देह |मनात अंधार|
आपुलकी धार| वरपांगी||||
माणुसकी रंग |जगी उधळावे|
मनातुनी व्हावे |आशावादी||||
इंद्रधनु रंग |सांडती भूवरी|
चैतन्याच्या सरी| आसमंती||||
सोडू जातपात |नको भेदभाव|
अंतरात भाव| एकात्मता||||
शुद्ध देहत्वाचे| मुक्त आलिंगन |
पवित्र हे मन |नित्य ठेवू||||
रंग हे प्रेमाचे |विश्वास भक्तीचे|
मनाच्या शक्तीचे |दावी रूप||||
सत्वगुण अंगी| दया क्षमा शांती|
घडेल उत्क्रांती |मानवाची||||