STORYMIRROR

Punyashil Wankhade

Romance

4  

Punyashil Wankhade

Romance

भूतकाळ आता पलीकडे गेलाय

भूतकाळ आता पलीकडे गेलाय

1 min
269

मन केलय मी खंभीर आता सारून भुतकाळ पलीकडे,

नव्या जगाची चाहूल ओळखून मन वळवलंय मी आता भविष्याकडे ।।


बरेच किस्से आहेत सुखंदुःखाचे भूतकाळातील,

ठेवायचेय जपून फक्त आता आनंदाचे क्षण त्यातले ।।


कळत न कळत आठवण येईल त्या क्षणांची पुन्हा पुन्हा कदाचित ,

आवरून स्वतःला जगायचे आहे वर्तमानात ध्येय साधूनी भविष्याचे।।


भूतकाळ आता पलीकडे गेलाय विचार तरी कसला त्याचा आता,

सुंदर जग वाट पाहत आहे पुढे आनंदात जगायचे सदैव आता ।। 


बघ जरा जगाकडे सुंदर किती दिसतं आहे ,

आयुष्य ही असचं सुंदर विचारांनी जगायचं आहे ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance