STORYMIRROR

Punyashil Wankhade

Others

4  

Punyashil Wankhade

Others

तुझी साथ पुरेशी आहे

तुझी साथ पुरेशी आहे

1 min
173

असता तू जवळी माझ्या स्वर्ग ही मला छोटा वाटतो ,

तू आहेस माझ्याजवळ यातच मला चैन पडतो ।।


तुझ्या पासून ही झर प्रेमाची वाहू लागली माझ्या जीवनी,

तू असणार आहेस अजून कसली आशा नाही मनी ।


ओंजळीत प्रेम माझ्या तुझं आहे , 

सरणार ना कधी आठवण तुझी सोबत आहे ।


तु माझं स्वर्ग तूच माझी कहाणी आहे ,

तू माझं कार्य तुच माझा धर्म आहे ।।


कारण तू माझा श्वास तूच माझं रक्त आहे ,

हरणार ना कधी माझं अतूट प्रेम तुझ्यावर आहे ।।


तुझा जीव आहे मी, तुझ्याच साठी आहे मी,

प्रेम आपलं खरं आहे , देवाला प्रार्थना करेल मी ।।


आयुष्य खूप कठीण असत जो चांगला वागतो त्याचीच परीक्षा होते,

कारण आपल्यात ते सामर्थ्य करण्याची जिद्द असते ।।


तुझ्या इतकं मला नाही कुणी समजावून घेतलं आजवर ,

तू आहेस म्हणून जिवात जीव असल्या सारख वाटतं ।।


प्रकाश तुझा मला अंधारातून वाचवतो आहे, 

तुझ्यासारखा सोबती मिळन हेच माझं भाग्य आहे ।।


Rate this content
Log in