STORYMIRROR

Punyashil Wankhade

Romance

3  

Punyashil Wankhade

Romance

प्रेमाचे क्षण

प्रेमाचे क्षण

1 min
203

क्षण पुढे पुढे सरकतोय आठवण तुझी त्यात ,

तुझ्याविना या क्षणाची कल्पनाही न डोक्यात ।

सूर माझा तू होऊनि असती ती ताल तुझी,

बघू कसा मी जगाकडे बेधुंद मी फक्त तुझ्यात ।।


डोळे मिटूनि बघितले मी जेव्हा जेव्हा ,

चेहरा डोळ्यासमोर येतो फक्त तुझा ,

दिसतेस तू मला माझी होऊनि 

निरागसता असते नेहमी तुझ्यात ।।


माझा म्हणण्याचा हक्क तू मला दिलास,

कसा सांगू मी या घड्याळीला तू असतेस हरएक सेकंदात ।।


मी तर तुझ्याच सोबत असतो न 

मग नको मला पैज कसली ,

तुझ्याविन करमत पण नाही कधी

मी तुझ्या संगती अन तू माझ्यात वसली ।।


सांगून च कळेल 

अस मन तरी कशाला ,

तू जरी नाही सांगितलं 

तरी कळते तुझं मन मला ।।


काय सांगू तुला,

ओढ तुझी मज लागली आता।

असेलही ती अजरामर माझ्यात नेहमी

न सांगता तुला कळेल आता ।।


काय सांगू तुला,

सुंदर जग दिसू लागलंय मला आता।

कारण फक्त एकच आहे तू आहे त्यात आता ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance