STORYMIRROR

Punyashil Wankhade

Romance

3  

Punyashil Wankhade

Romance

अमर प्रेम

अमर प्रेम

1 min
184

गुज या मनाची कळायची कसे कुणा,

जिथे तिथे तुझाच भास होतसे पुन्हा पुन्हा।।


तुझ्या मधुर आवाजाची आस ही मज लागली 

एक कोमल समजुतदार परी मज लाभली।।


तू असता क्षण हा माझा बहरूनी येतो आहे,

तुझ्यासारखी मुरत अजून मी बघितली नाही आहे।।


बघ तुझी शांतता आता बोलायला लागली आहे,

तुझी वाणी हळूच मनाशी बोलू लागली आहे।।


तू न सांगता ही मला तू ओळखू लागली आहे,

चाहुल ही मनाची तुझ्या जवळच उलगडायला लागली आहे।।


तुझी ती कोमल हाक मज ऐकू येति आहे,

मन माझं तुझ्यासाठी झुरु लागलं आहे।।


कसे मी उपकार फेडू देवाचे, तू जीवनी माझ्या आलीस,

आयुष्य होतं एकटं माझं त्यात तू स्वप्न बनून बहरलीस।।


कसे सांगू तुला तुझ्याविन क्षण ही अधुरा वाटतो आहे,

तुझ्यावर माझं अतूट अमर प्रेम आहे।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance