STORYMIRROR

Punyashil Wankhade

Romance

3  

Punyashil Wankhade

Romance

तू माझी संगिनी

तू माझी संगिनी

1 min
201

धुंदीत तुझ्या मन-मस्त-मगन बेधुंद होऊन

तुझ्या संग ही साथ माझी जुळली,

सखे तू माझी संगिनी

माझी तू शतःपावली ।।


तुझं असणं आता मला 

भुरळ पाडू लागलं जणू,

तू जशी माझ्या जीवनी

माणिक मोती जणू ।।


पर्व हे आपलं आता घट्ट 

बांधल्या गेलंय,

तुझ्याविन मला आता 

काहीही नकोसं वाटतंय ।।


तू बहरलीस परी बनून 

जीवनी माझ्या,

मी असेल काळजात

सदैव तुझ्या ।।


तुझीच चिंता आता, 

तुझीच साथ आता,

तूच नयनी आता, 

तूच आहेस फक्त आता ।।


तुझ्यात मी आता 

आणि माझ्यात तू आता,

शब्द माझा तू 

अन तुझा स्पर्श मी आता ।।


तूच संजोग माझ्या जीवनातला 

तूच आहे किनारा,

तुझ्यासाठी मी आता, 

सर्व तुझ्यासाठीच आता ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance