STORYMIRROR

Punyashil Wankhade

Romance Others

3  

Punyashil Wankhade

Romance Others

तू गीत तू संगीत

तू गीत तू संगीत

1 min
383

तू गीत तू संगीत 

तू सूर तू ताल 

तू वीणा तू नाद ...


तू शब्द तू बोल 

तू ओवी तू अभंग 

तू मधुर तू मंजुळ  ...


तू सरिता तू सागर 

तू किनारा तू क्षितिज 

तू वैशाख तू वसंत ...


तू डोळ्यात तू ओठात 

तू मनात तू ह्र्दयात 

तू स्वप्नात तू सत्यात ...


तू वर्तमानात तू भविष्यात 

तू विजेत तू चंचल वाऱ्यात 

तू श्वासात तू माझ्या स्पन्दनात.. 


तू अप्सरा तू उर्वशी 

तू रंभा तू दमयंती 

तू शंख तू शिंपले

तू माणिक तू मोती 


तू जीव तू प्राण 

तू सखी तू संगिनी 

तू सहचरणी तू अर्धांगिनी 

तू या प्रवासातील संजीवनी.

     


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance