STORYMIRROR

Punyashil Wankhade

Romance

4  

Punyashil Wankhade

Romance

माझी साजणी

माझी साजणी

1 min
625

सांज साजरी माझी सावली 

आली कुठून परी तू बनुन ,

बसलोय कधींच मी तुझा होऊन 

भेटली तू मज माझी साजणी होऊन ।।


भास तुझा असते सदा 

तुला शोधण्या मन असते सदा ,

हसतो मी सदा तुला आता पाहून

भेटली तू मज माझी साजणी होऊन ।।


असते तू काळजात माझ्या

मन हे माझे न राहिले न आता

हृदयात माझ्या असते तू आता,

सांगू कसा तुला मी तुझ्याजवळी येऊन

भेटली तू मज माझी साजणी होऊन ।।


भाव तुझे मज कळू लागले आता 

बघता तुला आता कळू लागले मला ,

दिसती तू मला सदा माझी होऊन

भेटली तू मज माझी साजणी होऊन ।।


डोळे मिटता दिसू लागली आता 

मन माझे नेहमी तुझ्यात असते आता ,

कसे सांगू तुला मी तुझा होऊन

भेटली तू मज माझी साजणी होऊन ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance