तुझं मन
तुझं मन
काय करू असं
जे तुझ्या मनाला भावेल
मी पुढे असेन
तुझं मन माझ्या मागे धावेल || 0 ||
कळत नाही कसं तूला
प्रेम माझं दाखवू
प्रेमाच्या या रंगात
कसं तूला माखवू
हृदयात तुझ्या माझं
निर्मळ प्रेम मावेल
मी पुढे असेन
तुझं मन माझ्या मागे धावेल || 1 ||
प्रेम या विषयाचं
तूच दैवत आराध्य
तूच प्रेरणा जगण्याची
तूच माझं साध्य
प्रीतीची ही देवता
माझ्या नवसाला पावेल
मी पुढे असेन
तुझं मन माझ्या मागे धावेल || 2 ||