वेल मी होणार
वेल मी होणार


वेल मी होणार माझा, गारवा हॊशील का तू?
पंख ज्यांचे मी असावे , तो थवा होशील का तू
देवभक्ती आत होते, पायरीला पारवा तो.
देवळाची पायरी मी , पारवा हॊशील का तू?
'पोतराजा जोगवा द्या', चाबकाच्या प्रेमहाका
जोगतीणी ने म्हणावे , जोगवा होशील का तू?
सोबतीला मैत्रिणी या, आसऱ्याच्या चार भिंती
देवळाची
भिंत मी ती, पायवा होशील का तू!
तोडले मी माळतांना, पाकळीला मोगऱ्याच्या
सांत्वना देणार त्याला, ती हवा होशील का तू
भावनेला साथ देते, गीत गाते रागमाला
माळते वैराग्य माझे, मारवा होशील का तू
का कडू ते संगतीने, साथ यावे चार प्याले
मी गुलाबी ओठ आहे, गोडवा होशील का तू