उघडझाप
उघडझाप
माझ्या आशा लबाड होत्या
हाका त्यांच्या उनाड होत्या
मैलांचा मी गुलाम झालो
पुढच्या वाटा सताड होत्या
श्रीरामाच्या अनंत माळा
माझ्यासाठी घबाड होत्या
गिर्यारोहण करीत जगलो
जिम्मेदाऱ्या पहाड होत्या
स्वप्नांना मी दिले न झोपू
निद्रा माझ्या गिधाड होत्या
काना डोळा करून मिटल्या..
डोळ्यांनी त्या किवाड होत्या
