तिचे मनोगत
तिचे मनोगत
तो जे जरा विसरला ते आठवायचे मी
ओळीत स्पंदनांच्या त्याच्या रहायचे मी
स्पर्शून जायचे मी आनंद चेहऱ्याचा
दुःखात तो नसावा जाणून घ्यायचे मी
त्याचे धकाधकीचे अस्तित्व धावणारे
त्याला कळू न देता त्याची असायचे मी
ते हास्य त्या खळ्यांचे त्यांच्यात थांबताना
रोखून दुःख त्याचे अश्रू बनायचे मी
तो एकटा अशाने पडला नसेन का हो
राहून त्यास गेले लक्षात यायचे मी

