भान
भान
चाल माझी संथ झाली सोबतीही छान आहे
संगतीला आपल्या ह्या मोकळेसे रान आहे
सोडतो मी चार ओळी काव्य येथे काय द्यावे
पौर्णिमेच्या गारव्याचे ह्या वहीला पान आहे
मी दिलेल्या आर्त हाका त्या ढगांनी ऐकल्या का?
की प्रिये त्या पावसाच्या पावलांना कान आहे?
आज सध्या ती स्वतःला सावरूनी घेत आहे
अमृताने गोड झालो हे फुलाला भान आहे
प्रेम दृष्टी ही तुझी जर लाजताना थेट आहे
ओठ माझे पाहताना खालती का मान आहे

