म्हणाम्हणी
म्हणाम्हणी
मेल्या वाचून जात नाही
आशेला अंत ज्ञात नाही
झालो मी जो अती शहाणा
बैलांचा ह्यात हात नाही
जेथे हे पाय पसरले मी
त्या अंथरुणात बात नाही
काना डोळा करून मिटले
पक्की डोळ्यास पात नाही
पाण्यामध्ये उधाण नाही
त्यांच्या राज्यात भात नाही
सुहास बोकरे
