STORYMIRROR

Suhas Bokare

Abstract Romance Others

4  

Suhas Bokare

Abstract Romance Others

गारठलेली गझल

गारठलेली गझल

1 min
253

अंग शहारून देत... वावरला गारठा

 तप्त मला गोठवून..ओघळला गारठा


मी इवल्या गारव्यास , मागवली सावली

मी नसलेला उगाच , पांघरला गारठा


ह्या ह्रदयाने म्हणून, बर्फ उरी ठेवला...

धावपळी वाढताच, अंथरला गारठा


बघत तिला...ऐकलेत...मी तर गाणे जुने

आणि विचारात शून्य , गोंधळला गारठा


वृक्ष पडे उन्मळून त्यावरती तो सुरा...

खच तुकड्यांचे बघून .. गारठला गारठा! 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract