गझलपुष्प
गझलपुष्प
होळीत आज पाहता राखेतली फुलं
सोडेचनात ओंजळी बागेतली फुलं
भांड्यातली मुळांविना काचेतली फुलं!
आणायला मुळं नवी ती चेतली फुलं
झोके गदागदा अता मी द्यायला हवे
ती भूलली पडायला शाखेतली फुलं
गेल्यात अश्वसंपदा ठेचून पाकळ्या
होतीच शूर आपल्या पागेतली फुलं
ह्या रंगपंचमीत तू आता भिजायचे
ओल्यात वाढलीत ह्या जागेतली फुलं
प्राजक्तगंध व्हायला डोळ्यातली नशा..
प्याला भरून प्यायला.. मी घेतली फुलं
