दृष्टी
दृष्टी
ऋणांचे चक्र झालो आज स्वप्नांचा चुरा केला
अता दे मार्ग जाण्याचाच मी हफ्ता पुरा केला
अवेळी रेडिओ हा फार देतो 'डॉक्टरी सल्ला'
मजा होती कशाला बंद तो 'शक्तीतुरा' केला!
मयूरी काठ आले आज गझलेच्या खयालांना
जरीने युक्त मी साकार शब्दांचा तुरा केला
तिला होती कळाली ठाम माझी नाटकी दृष्टी
तरी माझ्या तिने स्वाधीन अश्रुंचा धुरा केला!
मला केलेस तू घायाळ गुन्हा सिद्ध झाला हा
प्रितीने जप्त मुद्देमाल 'नजरेचा सुरा' केला

