तिथेच भेटू
तिथेच भेटू
अतोनात केले मी, तुझे हाल आयुष्या!
उशीराच मैत्रीची, मिठी घाल आयुष्या!
पिसाऱ्या प्रमाणे मी , भिरभिरं जमा केली
सुसाट्यास वाऱ्याच्या , दिली चाल आयुष्या!
किती राबता होता , इथे गालगुच्च्यांचा
दिसेनात हातांना , तुझे गाल आयुष्या!
समारंभ ही केला , इथे बंद श्वासांनी
तुला फक्त जातांना, दिली शाल आयुष्या!
अता रात्रही नाही , मजा देत आम्हाला
दवांच्या घरी खेळू , उषःकाल आयुष्या
