दुःख आम्ही या घराचे रंग होते मानले
शेष सारे त्या सुखांचे अंग होते मानले
ह्याच जन्मी खूप साऱ्या वेदना ज्या सांडल्या..
बांधले ते ईश्वराने चंग होते मानले
आसवांना वेगळा तो एक अश्रू वाटला...
पावसाला मी धुळींचे संग होते मानले
ना कधी मी व्यक्त केले क्रंदनाला या जगी...
या जगाची मी समाधी भंग होते मानले
होय होते.. आगळेसे या घराचे नांदणे..
हासणाऱ्या दर्शकांना..व्यंग होते मानले