कला
कला
ह्या ह्रदयाचे मचाण नादर केलेस तू
मोहक नृत्यास त्यात सादर केलेस तू
थांब तुझ्या यौवनास रंगवतो आज मी
पालटलेल्या हवेस स्थावर केलेस तू
सात सुरांच्या समीप जाणवते आर्द्रता
मंद्र अशा सप्तकास सागर केलेस तू
नाव कुठे टांगणार ह्या 'नटसम्राट' चे
उंबरठ्याचेच दार बेघर केलेस तू
मी शिकलो ह्या जगात स्वच्छ सिधे बोलणे
आज मला का उगाच शायर केलेस तू

