STORYMIRROR

Prashant Bhawsar

Romance

4  

Prashant Bhawsar

Romance

प्रेमपाऊस

प्रेमपाऊस

1 min
375

गवाक्षातूनी धुंद पाऊस पाहताना मन पळत सुटते बेधुंद!

देह घरात तर आत्मा अंगणात दोघेही भिजून ओलेचिंब!!


घरी कोरड्या देही अंगणी भिजल्या मनी सजनीची आठवण!

मनी जागती प्रेमस्वप्ने जपलेली मोरपिसासम साठवून!!


एकसुर संततधार पाहताना स्मारतो तो हळुवार क्षण!

रिपरिप धारांसंगे झुलते झोपाळ्यावर ओलसर मन!!


गार गार सरींसोबत तव स्पर्शासम बिलगती गारा!

त्यांच्यासंगे विरघळतो देह झेलूनी अंगावर कोवळा मारा!!


वाहून येतात वारे सोबती घेऊन शृंगारिक भूतकाळ!

थंड झुळूक देहभर पसरून उत्तेजित होतो वर्तमान!!


अंगणी गंध पसरती मातीचा बहरून गेल्यावर सांजपाऊस!

हृदयाचा तो कोपरा उजळवून टाके तुझ्या प्रितीचा प्रेमपाऊस!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance