STORYMIRROR

Prashant Bhawsar

Others

4  

Prashant Bhawsar

Others

वारकरी, विठ्ठल आणि लॉकडाऊन

वारकरी, विठ्ठल आणि लॉकडाऊन

1 min
575

काय प्रकोप झाला पांडुरंगा आम्हा भक्तांवरी।

की दर्शन न होई आमच्या लाडक्या विठू चरणी।।

वारीच्या अठरा दिवसांचेच मानतो वर्ष आम्ही।

वैश्विक संकट संपवून दे भेट आता आर्त मागणी।।


श्रीहरी दर्शनाविना आयुष्याची दोन वर्ष ठरली निकामी।

दुरूनच तुझ्या रूपाचे करुनी स्मरण येई डोळ्यात पाणी।।

विठुराया विरहात उरलेले जीवन करतो तुझ्या हवाली।

दे दर्शन नाहीतर घे प्राण अशी अवस्था आमची झाली।।


दिंड्या, वारकरी, भक्तांविना ओस पडली पंढरपूरनगरी।

धाय मोकलून रडते रिकामी तीर पाहून चंद्रभागा नदी।।

तुला नैवेद्य दाखवल्याबिगर घास न उतरे आमच्या नरडी।

कानडा राजा तुझ्या दरबारी बोलव धाडून आदेश वारकरी।।


ऐकून भक्तांची हाक पंढरीनाथ देई विविधरूपी दर्शन स्वप्नी।

वैकुंठात शोधू नको मला मी अवतरलो भूतलावरी।।

जाणून कर्तव्य माझे होऊन सेवेकरी करीतो सुश्रूषा भक्तांची।

देई उपदेश पहा मजला भक्तीपलीकडल्या नजरांनी।।


हातात लाठी, अंगात खाकी, राजमुद्रा डोक्यावरी।

अस्त्र हाती, वस्त्र पीपीई, डोळ्यात रुग्णांची काळजी।।

रुग्णवाहिका-सफाई कर्मचारी, संशोधन रसायन हाती।

घेतो निर्णय बनून मंत्री, राबतो होऊन सरकारी अधिकारी।।


भक्तांनो तुमच्याविना माझीही स्थिती काही वेगळी नाही।

सुन्या सुन्या गाभाऱ्यात आता माझेही मन रमत नाही।।

ब्रह्मांडाच्या नियमांमुळे निसर्गात हस्तक्षेप करवत नाही।

लवकरच भेटीला बोलवेल तुम्हा तुमचा विठू माऊली।।


Rate this content
Log in