STORYMIRROR

Prashant Bhawsar

Romance

3  

Prashant Bhawsar

Romance

पाऊस आणि तो

पाऊस आणि तो

1 min
342

सकाळपासून होते मी

त्याच्यावर रागात

येऊन मला मनवेल तो

होते वेड्या भ्रमात


तो काही आला नाही

धो-धो पाऊस मात्र आला

उगाच त्याच्या आठवणीत

मला चिंब भिजवून गेला


एकाएकी समोर तो

अचानक प्रकट झाला

घेरा घालूनी गळी

हळूच कानी म्हणाला


नुस्त्या शब्दांनी काही

तू ऐकायची नाहीस

म्हणून सोबतीला मी

घेऊन आलोय पाऊस


ऐकून त्याचे शब्द

झाले मी दंग

होताच त्याचा स्पर्श

रोमांचित झाले अंग


आता कसला राग

रुसवे नि फुगवे

न मनावताच मनून

थेट मिठीत घुसले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance