ऋतू वर्षा
ऋतू वर्षा
1 min
200
ग्रीष्म ते वर्षा असा
ऋतू कूस बदलता
उष्ण कात टाकतो
तप्त निसर्ग सारा
भरदिवसा जणू रात
ढगांचा वादळी गडगडाट
लाटांचे उसळत आवाज
तेजस्वी विजांचा कडकडाट
लागता अनामिक चाहूल
हलक्या बरसती धारा
नभी इंद्रधनूची रंगत
नृत्य करी रानमाळा
टपकता मोती थेंब
पसरे सुगंध मातीचा
मोहरती वृक्षांची पाने
दरवळे सुवास फुलांचा
जीव सजीव सारी सृष्टी
करी आनंद साजरा
नवचैतन्य घेऊन धरा
वर्षा ऋतू बरसत आला
