STORYMIRROR

Prashant Bhawsar

Others

3  

Prashant Bhawsar

Others

बेभान वारा

बेभान वारा

1 min
183

तिथे सुटला बेभान वारा

इथे उठले मनात वादळ

तो घुमला आसमंत सारा

हा घुटमळला देहभर


त्याने धारीले रौद्र रूप

ह्याने वाढविली तगमग

तो कडाडला होऊन विजा

हा भांबावला आतल्या आतच


त्याने बदलली ढगांची काया

धरणीला ही सुटले कंप

ह्याची वाढून गती श्वासांची

गुदमरून झाली घुसमट


त्याने उडवली जनांची त्रेधा

ह्याने उडवली मनाची खिल्ली

तो बरसला होऊन पाऊस

हा तडपला होऊन आग


तो बरसून झाला शांत

धरणीला केले थंडगार

हा बरसला डोळ्यांमधुनी

अशी शमवली दाह


Rate this content
Log in