STORYMIRROR

Prashant Bhawsar

Romance Tragedy Others

2  

Prashant Bhawsar

Romance Tragedy Others

गैर नाही

गैर नाही

1 min
4

प्रेमाच्या वाटेने गुलाबांवर चालताना

पायी काटे रुतने काही गैर नाही

रुतल्या काट्यांना आपल्या प्रेमाचा

लाल रंग लागणे काही गैर नाही


माझ्या प्रत्येक विनोदावर तुझे

खळखळून हसणे काही गैर नाही

हसता हसता तोल जाऊन

गळ्यात माझ्या पडणे काही गैर नाही


गाणे माझे ऐकताना तल्लीन होऊन

स्तुतीसुमने उधळणे काही गैर नाही

स्तुती करताना कोरड्या शब्दांऐवजी

ओठांनी प्रतिसाद देणे काही गैर नाही


भांडता भांडता माझ्यावर

हक्काने रुसणं काही गैर नाही

काढता रुसवा मी चुंबनाने

तुझे गोड लाजणे काही गैर नाही


हातात हात गुंफूण सुखी आयुष्याची

स्वप्न पाहणे काही गैर नाही

प्रेमाची परिसीमा गाठून एकमेकांवर

जीव ओवाळून टाकणे काही गैर नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance