STORYMIRROR

Prashant Bhawsar

Others

3  

Prashant Bhawsar

Others

मुर्ख मानव

मुर्ख मानव

1 min
383

जग जरी चालायचे थांबले

तरी पृथ्वीने परिवलन काही थांबवले नाही।

स्वतःच्याच धुंदीत घुमताना

परिभ्रमणाचा नाद कधी सोडला नाही।


आले कितीही प्रलय

तरी पक्षी काही उडायचे थांबले नाही।

ऊन वारा पाऊस थंडी

ऋतू कधी बदलायचे थांबले नाही।


होता मोठा शहाणा

त्याने ब्रह्मांडाला शोधण्याचे सोडले नाही।

चालला परग्रहांवर

स्वग्रहावरील अस्तित्व टिकवता येत नाही।


नवी सृष्टी कसा सजवेल

निस्वार्थी निसर्ग सांभाळता येत नाही।

एका अदृश्य विषाणूने

मानवाची जागा दाखवायची सोडली नाही।


दैवाने निर्माणीलेली सृष्टी

मानवाने विध्वंसायला थांबवली नाही।

आधुनिक संहारक शस्त्रास्त्रे शोधून

उध्वस्ततेकडे वाटचाल थांबवली नाही।


ओरबाडण्यात गेल्या पिढ्या

भिकेचे डोहाळे काही संपले नाही।

मरणाची वेळ दिसतेय समोर

तरी लुटमारीची भूक मिटत नाही।


हल्ले मारे शिकलास

स्वरक्षण करायला शिकला नाही।

तिरडी सजवायला शिकलास

स्वर्ग उपभोगायला शिकला नाही।


इतका कसा मुर्ख तू

तुला जगण्याचे समजले नाही।

देवदेखील पश्चतावत असेल

तुला मानव व्हायलाचं जमले नाही।


Rate this content
Log in