STORYMIRROR

Prashant Bhawsar

Others

4  

Prashant Bhawsar

Others

चाहूल पर्जन्याची

चाहूल पर्जन्याची

1 min
158

तप्त किरणे धरा तापवताना

अचानक येतो थंडसा गारवा

लक्ख प्रकाशी आसमंत सारा

हेरूनी चाहूल होतो सावळा


डोंगर दऱ्यात दौडत सुटतो वारा

धडकी भरवतो ढगांचा गडगडाट

घरी परततो पक्ष्यांचा थवा

नेत्री चमकतो विजांचा कडकडाट


वृक्षांची पाने फुले सळसळता

नाचतात मोर फुलवून पिसारा

आ वासून बसलेला चातक

मोजतो शेवटची व्याकूळ घटका


स्व अंश मिसळाया समुद्रात

ओढ असते थंडगार नभात

चाहूल टपोऱ्या थेंबांची लागता

लाटांना ही येते उधाण


चाहूल पर्जन्याची लागताना

निसर्ग देखील सज्ज होतो

स्वागत कराया मधू थेंबाचे

स्वाधीन करतो स्व देहाचे



Rate this content
Log in