STORYMIRROR

Rahul Salve

Romance

4  

Rahul Salve

Romance

भावना मनातल्या

भावना मनातल्या

1 min
710

भाव अंतरीचे बोलले असते मीही कधी

पण तुझ्या मनातल्या भावना जाणून घ्यायचे आहे...


कैकदा वाचल्या कथा प्रेमाच्या आजवर

आपल्या दोघांवर आता खूप लिहायचे आहे...


उसंत मिळाल्यावर ऐकली कित्येक गाणी

तुझ्यावर दोन ओळी प्रेमाने मला गायचे आहे...


बहरतील मळे या उजाड माळरानावर सौंदर्याचे

असे बीज प्रेमाच्या फुलांचे पेरायचे आहे...


रेखाटली चित्रे कल्पनेतून आकर्षणारी सारी

मनमोहक असे शिल्प तुझे कोरायचे आहे...


जमतील मैफिलीत रंग कविता अन् गझलेच्या

सोबतीला तिथे फक्त तुला न्यायचे आहे...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance