STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

केवळ तू

केवळ तू

1 min
254

श्रावण मासा मधली हिरवळ तू 

पर्वत रांगा मधले ओहळ तू 


साखर झोपे मधली स्वप्नपरी 

शुभ्र फुलांची भरली ओंजळ तू


आज तरी तू मजला दर्शन दे

दैवत माझे सजणी केवळ तू


लोभस गालावरची चंद्र खळी

सुंदर डोळ्यांमधले काजळ तू 


शुद्ध तुझी विचार धारा सजणी

कोंकण भागामधले नारळ तू 


कातर वेळी छळते मौन तुझे 

शांत किनार्‍यावरचे वादळ तू 


पैजण छणछण करते नाद तुझे 

संथ नदीची हसरी खळखळ तू 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance