STORYMIRROR

Hiralal Tamboli

Romance Others

4  

Hiralal Tamboli

Romance Others

माझी कविता

माझी कविता

5 mins
23.4K

 १.

    *माझी कविता*

कविता असावी शब्दांचा पदर घेणारी लाजरी बुजरी.

शब्दांतून स्मित हसणारी

ग्रामीण परंपरा जपणारी.

भावनिक,हळवी,रुसणारी शब्दांतून आसवं ढाळणारी.

कविता असावी शब्दांतून प्रेम करणारी,सोबत चालणारी.

महिलांसाठी प्रसंगी खंबीर,प्रतिकार करत

शब्दांनी लेखणीतून         अन्यायावर वार करणारी.

कविता असावी संस्कृती जपत व्यसन,अंधश्रद्धा भ्रूणहत्यावर प्रबोधन करणारी.

शब्दांतून देशसेवेचा गौरव करुन अभिमान दाखवणारी.

माझी कविता अशी असावी.

--------------------

२.     

     *प्रेम कविता*

प्रेम करावं मनावर

प्रेम असावं हृदयावर.

प्रेम करावं स्वप्नांवर

प्रेम असावं आत्म्यावर.

प्रेम करावं श्वासावर

प्रेम असावं विश्वासावर.

प्रेम करावं शब्दांवर

प्रेम असावं वचनावर.

प्रेम करावं जगण्यावर

प्रेम असावं भावनांवर.

प्रेम करावं नात्यांवर

प्रेम असावं काळजावर.

प्रेम करावं जिवावर

प्रेम असावं एकमेकांवर.

प्रेम करावं सुख दुःखावर

प्रेम असावं'आपल्या'वर.

प्रेम हे फक्त प्रेमच आहे

प्रेम असावं प्रेमावर...

--------------------

३.    

     *जळणं*             

स्वतः जळणारी जळूनही जिवंत रहातात.

अगरबत्ती मंदिरात सुगंध देते,

मेणबत्ती अंधारात प्रकाश देते.

कापूर देवाला सुवास देतो

लाकूड अग्नी देते.

सारे जळून राख होतात,

पण

धर्म आपला सोडत नाहीत. सारे धर्म पाळतात,

जळूनही जिवंत असतात.

इतरांसाठी राख होणं

रक्तात असावं लागतं,

मग

जळण्याची भीती कसली ?

हा ध्यास मनी बाळगतात...

-------------------

४.  

 व्यथा शेतकऱ्यांची.

शेतांमधी रातदिस राबून,

नशीब माझं मातीत पेरतो, घामाचं पाणी पाजतो मी,

सारे तुपाशी राहतो उपाशी मी....

कधी दुष्काळ,कधी महापूर

कधी गारा,नियतीचा मारा, सोसतो मी,कर्जाच्याफेऱ्यात

रोजच दुःखांशी लढतो मी...

नाही हमीभाव,नाही कष्टाला

दाम,नाही जगण्याला आराम

जगातल्या साऱ्यांना,घास भरवतो,बांधावरचटणीभाकर

खातो मी....

ऊन,वारा,पावसाची सवय मला,सुट्टीविना लढतो मी,

रिकामं आयुष्य,रिकामी झोळी,तरीही मृत्यूशी लढतो मी....

व्यथा माझ्या जपतो उराशी,

अश्रू सोबतअसती माझ्याशी

व्यथांची अखेर फाशी,व्यथा

निशब्द घेत निरोप अखेरचा

घेतो मी....

--------------------        

५.  

  शेतकरी होऊन बघा !

शेतकरी होऊन शेतात

राबून घाम गाळून,शेती करुन तरी बघा.

डोक्याला टपरी,अंगात

मुंडासं घालून उसाला

पाणी धरुन तरी बघा.

बैलामागं कुळव धरुन

चाड्यानं पेरणी करुन

भांगलन करुन तरी बघा.

घामानं भिजून दमल्यावर

बांधावर चटणी भाकर खाऊन तरी बघा.   दिसभर कष्ट करुन

सोप्यात अंग टाकून

आकाशाकडं टक लावून

झोप घेऊन तरी बघा.

पिकवून धान्य,भाजीपाला

बाजारात विकायला आणून

मालाची किंमत अनुभव

घेऊन तरी बघा,

शेतकरी होऊन तरी बघा !

--------------------        

६.   

   जगण्याचा ध्यास....

रोजच जगण्याची लढाई,प्रश्नांचं मनावर आक्रमण,स्वप्नांचा होतोय ऱ्हास,तरीही

माणसाला जगण्याचा ध्यास....

समस्यांचा चक्रव्यूह भोवती,पैशांची चिंता,

वेदनांचा सोसवेना त्रास,तरीही माणसाला जगण्याचा ध्यास....

जगण्यासाठी स्पर्धा,

पोटाचं खळगं भरण्यासाठी व्याप,

स्वार्थाचा शाप,तरीही

माणसाला जगण्याचा ध्यास....

आशेचा पाठलाग, मरणाची भीती,मात्र

जगण्याची हौस,तरीही

माणसाला जगण्याचा ध्यास....

--------------------                                   

७.  

  सुख शोधत राहिलो !

रोज त्रास सोसत मी

एकटा मुक्याने चाललो,

स्वप्न घेऊन उराशी

सुख शोधत राहिलो....

सारं क्षितिज डोळ्यात ठेवून

ध्येय गाठण्या पळालो,

वेड्यापरी रिकाम्या हाती

सुख शोधत राहिलो...

जगण्याच्या या धावपळीत

कितीदा दुःखाशी झगडलो,

पापणीत अश्रू दडवून मी

सुख शोधत राहिलो....

नाती सारी दुरावली ती

वेदना ह्रदयात सोसलो,

मृत्यूशी संघर्ष करत मी

सुख शोधतच राहिलो....

कंठाशी आले प्राण तरी

आशेचा पिच्छा करतराहिलो

घडी शेवटची आली तरी

स्वप्न सुखाचे बघत राहिलो

सुख शोधत राहिलो....

--------------------     

८.   

  करु कोरोनाची होळी.

येता चैत्राचा मास सोबतीस, नवा हर्ष-उल्हास,नवे वर्ष,

आलं कोरोनाचं नवं संकट, जसे मृत्यूचे,चैत्रावर अवेळी

करुन नैवेद्याची पुरणपोळी,

उभारु आरोग्याची गुढी,

संकल्प जीवनरक्षणाचा,करु

कोरोनाची होळी.

मीच माझा रक्षक राबवू मनी

मास्क वापरु,घरीच थांबू,

शासनाच्या आदेशांचे पालन

करु वेळोवेळी.

कोरोनाचे रुपाने मृत्यू उभा

समोर,लढून साजरा करु,

गुढीपाडवा सौख्याने,गुंफून

मानवतेची साखळी.

आभार त्यांचे जे झटतात

प्राण आपले वाचवण्यासाठी     

कोरोनामुक्त करु सारे मिळून

देऊन आरोळी.

-------------------- 

९.   

    @ कामगार....!

खळगी भरण्यास पोटाची,रात्रंदिन कष्टतो काम करुन गार झालेला,

नाव माझं कामगार...

कुटुंब माझं लढतंय जगण्याच्या लढाईत,

रोज प्रश्न नवे त्यांचे

माझ्या जीवावर,

नाव माझं कामगार...

गरिबीचा सामना रोज नव्याने,आशेच्या साऱ्या स्वप्नांना वेदनेची झालर,

नाव माझं कामगार...

मोजकाचं पगार,त्यात

कर्जानं बेजार,त्रस्त मी

उचलून संसाराचा भार

नाव माझं कामगार...

हौस,अपेक्षा,आनंद

साऱ्यांचा मावळला,

तडजोडीचा माझा

पगार,

नाव माझं कामगार....

आयुष्यभर झगडतो,

कामास सदैव तयार,

ऊन,पावसातही राबतो विनातक्रार,

नाव माझं कामगार...

रोज कामच काम, नाही जीवाला आराम,

कधी मिळेल श्रमाला

पूर्णविराम,मेल्यावर ?

नाव माझं कामगार....

--------------------   

१०.   

   कवी मनाचा माणूस लेखणीतून शब्दांना जिवंत

करतो,स्वप्नांना पंख देतो, कवितेला सुगंध देतो,

कारण....

मी कवी मनाचा माणूस.

मनाला कल्पनेची जोड देतो

आठवणी ह्रदयात साठवतो,        

कारण....

मी कवी मनाचा माणूस.

विस्कटलेले शब्द गुंफतो,

कवितेत रंग भरतो,

शब्द शरदेची पूजा करतो

कारण....

मी कवी मनाचा माणूस.

शब्द-शब्दांची पेरणी करतो भावनांचं त्याला शिंपण करतो,कवितेत अंकुर फुलवतो,कारण....

मी कवी मनाचा माणूस.

 -------------------       

११.      वृक्ष...!                 

एक वृक्ष जुना होता दोघांविना सुना होता.

नक्षीदार वृक्ष आठवणीतल्या

प्रेमाचा साक्षीदार होता.

इथेच एकांती रमलो होतो

आठवणींत हरवलो होतो.

मनात स्वप्ने गुंफत होतो वेळात वेळ विसरलो होतो.

वृक्षालाही माहीत होते

क्षण इथे विस्कटले होते.

मन मनात गुंतले होते

हृदयाशी नाते जुळले होते.

भविष्याचे स्वप्न रंगले होते.

--------------------"            

१२.

  आठवणीतील आई"

आई,

तुझ्या आठवणीतलं

प्रेम काळजाच्या कुपीत

अजूनही जपलं आहे.

तू पाठीवर फिरवलेल्या हातांचा नाजूक स्पर्श

मोरपीसासम भासतो

आहे.

स्वतः चटके सोसत मला

दिलेल्या चटणी भाकरीची

चव आजही आठवते

आहे.

दादाशी भांडल्यावर पाठीत प्रेमाने रपाटा घालुन माझी

काढलेली समजूत ह्रदयात आहे.

तू देवाघरी गेल्यावर दुःख

अन पोरकेपणाच्या वेदना

रोज आसवांतून सांडतो आहे.

तुझ्या आठवणीच्या प्रेमाचा

प्रत्येक क्षण अजूनही माझ्या

ह्रदयाला रोज सलतो

आहे.

--------------------

१३.  

  माय मराठी

शब्द जिंकतात कविता

कविता फुलवते साहित्य

शब्द-शब्द आहे मोलाचा

भाषेच्या प्रगती साठी

    जिथे रमते माय मराठी

कथा,कविता,नाटक असे

साहित्यांचे पैलू सारे घडती

कोंदणी हिऱ्यासम चकाकती जे जपले आहे पिढ्यांसाठी

   जिथे बोलते माय मराठी

साहित्याला नाही सीमा ते

गाजते सातासमुद्रापार,झेंडा

फडकतो अखंड साहित्याचा

साहित्य पोहचले जगतापाठी

    जिथे स्फुरते मायमराठी

--------------------  

१.

प्रेमात किती ताकत आहे

हे प्रेमात पडल्यावर कळतं

कुणासाठी प्रेमानं जपलेलं ह्रदय,कुणासाठी तरी उरात जळतं

--------------------

२.

दुःख मला रोज छळते

वेदनांची सल अश्रूंना कळते

मनाच्या गाभाऱ्यातून दुःख

पापण्यांच्या दारातूनओघळते

--------------------      

३.

माझं मन अथांग नदीसारखं

सुखदुःख,वेदना सामावूनघेतं

आली संकटं उरात साठवतं

ध्येयासाठी जगण्याशी लढतं

--------------------

४.

शब्दांशी जोडू शब्दांचे मोती

साहित्यातून जोडू नवी नाती

कवितेतून करुन शब्द शृंगार

फुलवू प्रबोधनाचा सुप्त अंगार

--------------------

५.

वाळूतल्या चिंब पाऊलखुणा

फेसाळल्या लाटांनी मिटवल्या. 

भेटीच्या ओलेत्या आठवणी

सागराने मिठीत साठवल्या.

--------------------      

६.

पिसारा फुलवून नाचणाऱ्या

मोराला अश्रूंचा शाप आहे.

मुक्या सौंदर्याच्याकाळजाला

नियतीच्या वेदनेचे पाप आहे

--------------------

७.

मनाला स्वप्नांचा शाप आहे

डोळे मिटल्यावर डोकावतात

उध्वस्त झाल्यावर ती सारी

मनही उध्वस्त करुन जातात

-------------------- 

८.

ज्यांच्या जीवावर जगतो आम्ही निर्धास्त ते आपुली शान

रात्रदिन थकली नाही सेवा ज्यांची ते जय जवान जय किसान

--------------------

९.

कळ्यांची फुलं व्हावी तशी

शब्दांचीही फुलं उमलतात

सुगंधातुन मनाच्या भावना

कवितेच्या ओळींनी फुलतात

--------------------

१०.

जगण्याची लढाई असं लढायचं,

कधी तू भांडायचं,कधी रुसायचं.

आयुष्यात सुखदुःखाच्या वळणावर,

दोघांनी प्रेमानं हसतच जगायचं.     

--------------------

११.

मनाच्या आरशावर भावनांचे

शब्द कवितेत रेखाटत गेलो.

शब्दांचे प्रतिबिंब उमटत गेले

आठवणींचे क्षण साठवत गेलो.

--------------------

१२.

प्रेमाची भाषा कळायला

शिक्षण नसलं तरी चालतं

शब्द न वाचताही मनाशी

मन सारं इशाऱ्यानं बोलतं

--------------------

१३.

तू न मी कितीदा ठरवलंय

अखंड प्रेमानं दोघ वागायचं

पण,तू सोडून गेल्यावर मला

सांग विरहात कसं जगायचं

--------------------

१४.

आयुष्य जगताना सुख,दुःख

वेदनांशी चांगली मैत्रीजमली

कधी रडत,कढत तर कधी                  

 हसत खेळत नाती जपली.

--------------------

१५.

जगणं पोरकं झाल्यावर

मुलाला आईचं महत्व कळतं

लढ म्हणायला कुणी नसलं की बापाचं महत्व कळतं

--------------------

१६.

मनाच्या डायरीत पानोपानी

प्रेमाची आठवण लपलीआहे

पाने खराब झाली तरी शब्दांनी प्रीत आपली जपली आहे

--------------------

१७.

तुझ्या आठवणींचे सोनेरी क्षणओंजळीत होते जपलेले.

क्षणात नकळत सारे क्षण

फसवून मला विरुन गेले.

--------------------

१८.

जगण्याची लढाई एकट्याची असते,

बाकी सारे सोबत असतात.

वेदना,यातना एकट्याने सोसायच्या,

बाकी सारे सहानुभूतीला

असतात.

---------------- ----

१९.

शब्द लेखणीत साठवून मी

कवितेने श्रीमंत झालो.

शब्द सारे पाठवून मी

शेवटी रिकामाच झालो.

--------------------

२०.

ह्रदयात जपलेल्या भावना

शब्दांनी पेरत गेलो.

अंकुरलेले शब्द मनातले

कवितेत जपत गेलो.

--------------------

२१.

मनाच्या खोप्यामधी एक पाखरु गुटर-गु करते आहे.

सांकेतीक भाषेत प्रेयसीला

प्रेमाने साद घालते आहे.

--------------------

२२

आपलं नातं हजारात कळतं

जिव्हाळाही निर्माण करतं

नातं आपुलकीचं असलं की

मन मनाशी अलगद जुळतं

--------------------        

२३.

हल्ली प्रेमावर मी लिहीत नाही

मनाच्या पटलावर झालेल्या अन विसरुन गेलेल्या जुन्या जखमांना ताजे करत नाही.

------------------

२४.

तुझ्या नजरेत हरवत गेलो,

आणि स्वप्न होऊन बसलो.

क्षणिक जगणं जगत गेलो,

भंगून गेल्यावर शून्य झालो.

-------------------   

२५.

कधी कधी शब्दही रडतात

त्यांची आसवं पुसणार कोण

त्यांच्या वेदनांवर फुंकर घालून

त्यांवर मलम लावणार कोण

--------------------

२६.

मनातल्या मुक्या भावनांना

शब्दांनी त्राण आणला.

ह्रदयीं दुखावल्या वेदनांना

कवितेनं प्राण आणला.

--------------------

२७.

तिन्हीसांजला सूर्याच्यासोनेरी

किरणांची झालर खुलते.

अन रातीच्या गर्द अंधाराला काळोखाची चादर पांघरुण

घालते.

--------------------

२८.

मनाच्या कप्प्यात प्रेमाचे

क्षण आजही जपलेले आहेत

प्रेमाची पाहिलेली स्वप्नं तुझी

ह्रदयात जतन केलेलीआहेत

--------------------

२९.

पंखावर आभाळ पेलून मी,

मुक्तपणे फिरत राहिलो.

पंख छाटल्यावर मात्र डोळे,

आभाळाकडे लावून  तडफडत राहिलो.

--------------------

३०.

चिमूटभर वेदनांचं आभाळभर दुःख मी मनात साठवलं.

डोळ्यांना ते सोसवलं नाही

त्यांनी दुःख अश्रूंतून पाठवलं

********************

३१.

पाण्यातल्या मासोळीला पाण्यात

समुद्राएव्हढा आनंद मिळतो

पण,छोटासा गळ मात्र

तिचा चिमूटभर प्राण गिळतो

********************

३२.

तू बागेत आल्यावर गुलाब

जरा जास्तच खुलतोय.

बाकी फुलांना चिडवत आपण जरा रुबाबात डोलतोय.

********************

३३.

प्राजक्ताचं झाड माझ्या अंगणात,

फुलांचा सडा तुझ्या अंगणी

पडतो.

मला सोडून फुलांचा जीव

तुझ्यावर कसा काय जडतो.

*******************

३४.

प्रेम करावं मनावर

प्रेम असावं हृदयावर.

प्रेम करावं स्वप्नांवर

प्रेम असावं आत्म्यावर.

--------------------

३५.

प्रेम करावं श्वासावर

प्रेम असावं विश्वासावर.

प्रेम करावं शब्दांवर

प्रेम असावं वचनावर.

--------------------

३६.

प्रेम करावं जगण्यावर

प्रेम असावं भावनांवर.

प्रेम करावं नात्यांवर

प्रेम असावं काळजावर.

--------------------

३७.

प्रेम करावं जिवावर

प्रेम असावं एकमेकांवर.

प्रेम करावं सुख दुःखावर

प्रेम असावं'आपल्या'वर.

--------------------

३८.

मनातल्या मनात रोज मी

प्रेमाचा हिशोब जुळवतो

मनातलं भाव सारे ह्रदयातुन

शब्दांतून कवितेत कळवतो

--------------------

३९.

मनाच्या कप्प्यात प्रेमाचे

क्षण आजही जपलेले या

पाहीलेली प्रेमाची स्वप्नं तुझी

ह्रदयात जतन केलेली आहेत

--------------------

४०.

मी पुन्हा येईन असं सांगत

तू निघून गेलीस अन

राजकारणी नेत्यासारखं

प्रेमाचं राजकारण करुन गेलीस.

--------------------

४१.

तुझ्या माझ्या प्रीतीचा वारा,

सखे,मनातून मनाशी वाहतो.

गंध प्रीतीच्या फुलांचा सारा,

ह्रदयातून काळजाशी गुंततो.

--------------------

४२.

प्रेमाची भाषा कळायला

शिक्षण नसलं तरी चालतं

शब्द न वाचताही मनाशी

मन सारं इशाऱ्यानं बोलतं

–--------------------

४३.

तू न मी कितीदा ठरवलंय

अखंड प्रेमानं दोघ वागायचं

पण,तू सोडून गेल्यावर मला

सांग विरहात कसं जगायचं

––-------------------

४४.

मनाच्या डायरीत पानोपानी

प्रेमाची आठवण लपलीआहे

पाने खराब झाली तरी

शब्दांनी प्रीत आपली जपली आहे

--------------------

४५.

प्रेमाचं नातं हजारात कळतं

जिव्हाळाही निर्माण करतं

नातं आपुलकीचं असलं की

मन मनाशी अलगद जुळतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance