कवी
कवी
कवितेच्या प्रदेशात फिरताना
मी शब्द-शब्द वेचत गेलो.
कुठे मनातले,कुठे ह्रदयातले
शब्द कागदावर टिपत गेलो.
--------------------
शब्द भावनेतले,शब्द वेदनेतले
रोज नव्या शब्दांना भेटत गेलो.
दुःखाचे अर्थ शब्दांनी सांगून गेलो.
मनाच्या भावना अश्रूंनी सांडत गेलो.
--------------------
दुःखानी भिजलेले शब्द
मांडत गेलो.
कल्पनेचं स्वप्न लेखणीने पहात गेलो.
हृदयीच्या वेदनांना मोजत गेलो.
शब्द शब्दांत गुंफत गेलो.
--------------------
विखुरलेले शब्द वेचत गेलो.
शब्द फुलवून सुगंधित करत
गेलो.
कवीचं जगणं कवितेत जगत गेलो.
शब्दांतून जगण्याचा श्वास घेत गेलो.