Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Hiralal Tamboli

Romance

2  

Hiralal Tamboli

Romance

चारोळी

चारोळी

2 mins
606


१.

प्रेमात किती ताकत आहे

हे प्रेमात पडल्यावर कळतं

कुणासाठी प्रेमानं जपलेलं हृदय,

कुणासाठी तरी उरात जळतं

--------------------

२.

दुःख मला रोज छळते

वेदनांची सल अश्रूंना कळते

मनाच्या गाभाऱ्यातून दुःख

पापण्यांच्या दारातूनओघळते

--------------------

३.

माझं मन अथांग नदीसारखं

सुखदुःख,वेदना सामावूनघेतं

आली संकटं उरात साठवतं

ध्येयासाठी जगण्याशी लढतं

--------------------

४.

शब्दांशी जोडू शब्दांचे मोती

साहित्यातून जोडू नवी नाती

कवितेतून करुन शब्द शृंगार

फुलवू प्रबोधनाचा सुप्त अंगार

--------------------

५.

वाळूतल्या चिंब पाऊलखुणा

फेसाळल्या लाटांनी मिटवल्या.

भेटीच्या ओलेत्या आठवणी

सागराने मिठीत साठवल्या.

--------------------

६.

पिसारा फुलवून नाचणाऱ्या

मोराला अश्रूंचा शाप आहे.

मुक्या सौंदर्याच्याकाळजाला

नियतीच्या वेदनेचे पाप आहे

--------------------

७.

मनाला स्वप्नांचा शाप आहे

डोळे मिटल्यावर डोकावतात

उध्वस्त झाल्यावर ती सारी

मनही उध्वस्त करुन जातात

--------------------

८.

ज्यांच्या जीवावर जगतो आम्ही

निर्धास्त ते आपुली शान

रात्रदिन थकली नाही सेवा

ज्यांची ते जय जवान जय किसान

--------------------

९.

कळ्यांची फुलं व्हावी तशी

शब्दांचीही फुलं उमलतात

सुगंधातुन मनाच्या भावना

कवितेच्या ओळींनी फुलतात

--------------------

१०.

जगण्याची लढाई असं लढायचं,

कधी तू भांडायचं,कधी रुसायचं.

आयुष्यात सुखदुःखाच्या वळणावर,

दोघांनी प्रेमानं हसतच जगायचं.

--------------------

११.

मनाच्या आरशावर भावनांचे

शब्द कवितेत रेखाटत गेलो.

शब्दांचे प्रतिबिंब उमटत गेले

आठवणींचे क्षण साठवत गेलो.

--------------------

१२.

प्रेमाची भाषा कळायला

शिक्षण नसलं तरी चालतं

शब्द न वाचताही मनाशी

मन सारं इशाऱ्यानं बोलतं

--------------------

१३.

तू न मी कितीदा ठरवलंय

अखंड प्रेमानं दोघ वागायचं

पण,तू सोडून गेल्यावर मला

सांग विरहात कसं जगायचं

--------------------

१४.

आयुष्य जगताना सुख,दुःख

वेदनांशी चांगली मैत्रीजमली

कधी रडत,कढत तर कधी हसत खेळत नाती जपली.

--------------------

१५.

जगणं पोरकं झाल्यावर

मुलाला आईचं महत्व कळतं

लढ म्हणायला कुणी नसलं की बापाचं महत्व कळतं

--------------------

१६.

मनाच्या डायरीत पानोपानी

प्रेमाची आठवण लपलीआहे

पाने खराब झाली तरी शब्दांनी प्रीत आपली जपली आहे

--------------------

१७.

तुझ्या आठवणींचे सोनेरी क्षणओंजळीत होते जपलेले.

क्षणात नकळत सारे क्षण

फसवून मला विरुन गेले.

--------------------

१८.

जगण्याची लढाई एकट्याची असते,

बाकी सारे सोबत असतात.

वेदना,यातना एकट्याने सोसायच्या,

बाकी सारे सहानुभूतीला

असतात.

---------------- ----

१९.

शब्द लेखणीत साठवून मी

कवितेने श्रीमंत झालो.

शब्द सारे पाठवून मी

शेवटी रिकामाच झालो.

--------------------

२०.

ह्रदयात जपलेल्या भावना

शब्दांनी पेरत गेलो.

अंकुरलेले शब्द मनातले

कवितेत जपत गेलो.

--------------------

२१.

मनाच्या खोप्यामधी एक पाखरु गुटर-गु करते आहे.

सांकेतीक भाषेत प्रेयसीला

प्रेमाने साद घालते आहे.

--------------------

२२

आपलं नातं हजारात कळतं

जिव्हाळाही निर्माण करतं

नातं आपुलकीचं असलं की

मन मनाशी अलगद जुळतं

--------------------

२३.

हल्ली प्रेमावर मी लिहीत नाही

मनाच्या पटलावर झालेल्या

अन विसरुन गेलेल्या

जुन्या जखमांना ताजे करत नाही.

------------------

२४.

तुझ्या नजरेत हरवत गेलो,

आणि स्वप्न होऊन बसलो.

क्षणिक जगणं जगत गेलो,

भंगून गेल्यावर शून्य झालो.

-------------------

२५.

कधी कधी शब्दही रडतात

त्यांची आसवं पुसणार कोण

त्यांच्या वेदनांवर फुंकर घालून

त्यांवर मलम लावणार कोण


Rate this content
Log in