माझी कविता
माझी कविता
1 min
272
कविता असावी
शब्दांचा पदर घेणारी लाजरी बुजरी...
शब्दांतून स्मित हसणारी
ग्रामीण परंपरा जपणारी...
भावनिक, हळवी, रुसणारी
शब्दांतून आसवं ढाळणारी...
कविता असावी शब्दांतून प्रेम करणारी,
सोबत चालणारी...
महिलांसाठी प्रसंगी खंबीर, प्रतिकार करत
शब्दांनी लेखणीतून अन्यायावर वार करणारी...
कविता असावी संस्कृती जपत
व्यसन, अंधश्रद्धा, भ्रूणहत्येवर प्रबोधन करणारी...
शब्दांतून देशसेवेचा गौरव करुन
अभिमान दाखवणारी...
माझी कविता अशी असावी...
