जगाला आज सुट्टी आहे
जगाला आज सुट्टी आहे

1 min

194
आज जगाला सुट्टी आहे,
आई मात्र राबते आहे....
चुलीवर स्वयंपाक सुरु आहे,
चटके सोसून घास भरवता,
जेवणाचा पर्याय चालू आहे,
साऱ्यांचा भुकेची चिंता आहे
आई मात्र राबते आहे....१.
कुटुंब टी.व्ही.त दंग आहे,
कुणी मोबाईलमध्ये व्यस्त आहे,
न थकता कष्ट करते,
साऱ्यांची आईला चिंता आहे
आई मात्र राबते आहे..२.
हाताचा पाळणा,नेत्रांचा दिवा करुन
रात्रभर जागते, मातृत्व सांभाळते आहे,
साऱ्यांची तिला चिंता आहे
आई मात्र राबते आहे...३.
त्रास,वेदना ती सोसते
सदैव दुःख वाट्याला
तरीही दुःखाशी लढते आहे
साऱ्यांना सुख वाटते आहे
आई मात्र राबते आहे...४.