ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
66
नभ भरुन आले
मंद गार वारा सुटला
चाहूल लागे आगमनाची
साऱ्यांचे मनीं ओढपावसाची
रिमझिम आला पाऊस चिंब
मन भिजवून गेला
शहारल्या तनूला आसउबेची
ह्रदयी लागे ओढ पावसाची.
कधी येणार मुसळधार
कधी पाणी खळखळणार
कधी सौंदर्य खुलणार धर्तीचं
कधी दिसेल शोभा हिरवाईची.
तहानली धरती सारी
बीज अंकुरे ओल्या मातीत
बळीराजाला लागे ध्यास
काळ्या आईस ओढ पावसाची.