शहिद सैनिकाच्या मुलाची भावना
शहिद सैनिकाच्या मुलाची भावना
देशासाठी लढले बाबा माझे
ह्रदयात जपले दुःखाचे ओझे.
एक एक वेदना उरी सोसूनी
शरीर रक्ताळले घाव झेलूनी.
तरीही नाही स्वीकारली हार
शत्रूंशी झुंजले करीत प्रहार.
लढाई लढत होते ते शौर्याने
मृत्यूशी भिडले शेवटी धैर्याने.
प्राण अर्पिला तिरंग्यासाठी
त्यांनी रक्त सांडले देशासाठी.
आठवणीने डोळे ओलावती
पोरके आम्ही जगतो एकांती.
दुःख साठवून मनात,ओठी
झुरतो आम्हीरोज बाबांसाठी.
तरीही आहे त्यांचा अभिमान
जिंकून मृत्यू वाढवली शान.
बलिदानाने कीर्ती अखंड राहो...
बाबा,तुम्ही सदैव अजरामर राहो....