जळणं
जळणं
1 min
316
स्वतः जळणारी जळूनही
जिवंत रहातात.
अगरबत्ती मंदिरात सुगंध देते,
मेणबत्ती अंधारात प्रकाश देते.
कापूर देवाला सुवास देतो
लाकूड अग्नी देते.
सारे जळून राख होतात,
पण
धर्म आपला सोडत नाहीत.
सारे धर्म पाळतात,
जळूनही जिवंत असतात.
इतरांसाठी राख होणं
रक्तात असावं लागतं,
मग
जळण्याची भीती कसली ?
हा ध्यास मनी बाळगतात...
