जगाचा पोशिंदा
जगाचा पोशिंदा

1 min

215
भविष्य डोळ्यात साठवून
बळीराजा स्वप्न पेरतो मातीत
घाम धर्तीत शिंपून अहोरात्र
पिकवतो भाकरीचे मोती भुईत
थकलेला जीव बांधावर
घडीभर तो विसावा घेतो.
पुसून घामाचं थेंब सारं
चव भाजीभाकरीची चाखतो
मालकीण जावा येते रानात
शीण सारा इसरुन जातो.
दुष्काळानं करपल्या शिवारात
हिरवाईत जीव रमुन जातो.
राबून घाम गाळता शेतीत
मळा स्वप्नांचा फुलवतो
जगाचा पोशिंदा असा साऱ्यां
साठी भाकरीचे मोती पिकवतो.